Search mpsc government jobs, mpsc study material, mpsc current affairs, चालू घडामोडी, news paper, question paper pdf, ebbok pdf et. all type of mpsc study material.

GOVERMENT JOB

Saturday, 21 September 2019

21 सप्टेंबर: राणी रामपालकडे हॉकीचे नेतृत्व

-स्टार फॉरवर्ड राणी रामपाल हिच्याकडे इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया या दौºयात पाच सामने खेळविले जातील. 
📌४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. बचावफळीत दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निरा खोखर आणि सलिमा टेटे, नमिता टोप्पो, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ यांना स्थान देण्यात आले आहे. 
📌मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘आम्ही टोकियो आलिम्पिकसाठी पात्रता गाठण्यात महत्त्वाच्या वळणावर आहोत. या दौºयाचा लाभ ओडिशात होणाºया एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध खेळताना निश्चित होणार आहे.’ 

🔴महिला हॉकी संघ 
📌सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू बचावफळी : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना 
📌खोखर, सलिमा टेटे.मधली फळी : सुशीला चानू पुखराम्बाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल,   📌लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.
Share:

21 सप्टेंबर: मयंक वैद: ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करणारा प्रथम भारतीय

-जगातली सर्वाधिक खडतर अशी ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करून मयंक वैदने नवा विश्वविक्रम केला आहे. 42 वर्षांचा मयंक वैद ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई खेळाडू ठरला. ही स्पर्धा पूर्ण करणारी ती जगातली 44 वी व्यक्ती आहे.

-ही स्पर्धा 50 तास 24 मिनिटांत पूर्ण करून त्याने नवा विक्रम केला. आधीचा विक्रम बेल्जिअमच्या ज्युलिअन डेनेअर ह्याच्या नावावर 52 तास 30 मिनिटांचा होता.

-मयंक वैदचा जन्म विलासपूरचा आहे आणि सध्या ते हाँगकाँगचा निवासी आहे. व्यवसायाने वकील असलेले मयंक वैद एका कंपनीत इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डायरेक्टर आहे.

स्पर्धेविषयी

-ट्रायथलॉन हा एक वेगवेगळा क्रिडाप्रकार आहे, ज्यात प्रामुख्याने धावणे, पोहणे आणि सायकलिंग असते. ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धेसाठी लंडनपासून फ्रान्सपर्यंतचे अंतर पार करावयाचे असते.

-140 किलोमीटर धावणे, 33.8 किलोमीटर समुद्रातून पोहून जाणे आणि 289.7 किलोमीटर अंतर सायकलिंग करणे हे भाग या स्पर्धेत आहेत.
Share:

21 सप्टेंबर: राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळा

📌शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी, उर्दू , हिंदी आणि गुजराती भाषेतही प्रकाशित होते.

📌जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते. यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे.

📌या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.

📌मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.
Share:

21 सप्टेंबर: BBPS द्वारे सर्व आवर्ती बिले भरण्यास RBIची परवानगी

✍16 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) यांच्या देयकांसंबंधी सेवांमध्ये (प्रीपेड रिचार्ज वगळता) सर्व आवर्ती बिलांसंबंधी देयकांना (शालेय शुल्क, विमा भत्ता आणि पालिका कर) समाविष्ट करून व्याप्ती वाढविलेली आहे.

✍सध्या, BBPS DTH, वीज, गॅस, दूरसंचार आणि पाणी या पाच विभागांच्या बिलांसाठी सेवा पुरवित आहे. आता त्याच्या सेवांमध्ये सर्व बिलांचा समावेश करण्यात आला आहे.

✍एजंट्सच्या जाळ्याद्वारे, बहुपर्यायी देयक पद्धती उपलब्ध करून आणि देयकांची त्वरित निश्चिती प्रदान करून ग्राहकांना एकाच जागी बिले भरण्यासाठी एकात्मिक डिजिटल सेवा प्रदान करणे हे BBPSचे उद्दीष्ट आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) याच्या अखत्यारीत BBPS कार्य करते.
Share:

21 सप्टेंबर: तेल टंचाईचे सावट - सौदी अरेबियाने निम्मं तेल उत्पादन थांबवलं

✍इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेल क्षेत्रांना ड्रोनने निशाना केलं. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के अर्थात निम्मं तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

✍जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या अरामको कंपनीच्या दोन क्षेत्र बॉम्ब वर्षावाने हादरली. शनिवारी इराणच्या हुथी बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस या दोन ठिकाणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोनमधून हल्ले केले. या हल्ल्यानंतर दोन्ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. सौदी अरेबियाने येमेनमधील हुथी नियंत्रित क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान, अरामकोच्या दोन तेल क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्मं तेल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

✍सौदी सरकारच्या या निर्णयामुळे जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला ५.७ मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) म्हणजेच ५ टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या अरामकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला ९.८५ मिलियन बॅरल होते.

✍अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. “हल्ल्यामुळे गॅस उत्पादनाही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी होणार आहे”, अशी माहिती सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान यांनी दिली आहे.
Share:

21 सप्टेंबर: IIFA AWARDS 2019

‼️ 'राझी' सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. ‼️

✍आयफा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी अवघी इंडस्ट्री उपस्थित होती.

✍आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या 'राझी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला.

✍तर याच सिनेमातील दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पद्मावत सिनेमासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

✍आयुष्मान खुरानाच्या अंधाधुन सिनेमाला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला.आयफा पुरस्कार सोहळ्याला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली.

✍दरवर्षी आयफा पुरस्कार परदेशाता होतात. मात्र यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.

✍या सोहळ्यात सलमान खान, कटरिना कैफ, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा, शाहिद कपूर, विकी कौशल, अदिती राव हैदरी, डेजी शाह, रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख या मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

🌺IIFA AWARDS 2019 - आयफा पुरस्कार सोहळ्यातील विजेते 2019🌺

● सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
● सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर
● गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
● गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
● सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
● सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
● जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
● सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)

Economics Online Academy
💕 विद्यार्थ्यांची चळवळ, पुणे 💕
Share:

21 सप्टेंबर: ग्लोबल AMR R&D हब या गटात भारत सामील.

✍ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी भारत सामील झाला. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातल्या जैवतंत्रज्ञान विभागाने यासंबंधी घोषणा केली.

✍जगापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सहयोगासाठी कार्यरत असलेल्या या भागीदारीत आता 16 सदस्य देश, युरोपियन कमिशन, दोन स्वयंसेवी फाऊंडेशन आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था (निरीक्षक म्हणून) आहेत.

✍मे 2018 मध्ये ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हबची स्थापना करण्यात आली.

✍वैश्विक जिवाणूरोधी प्रतिकारक क्षमतेसंबंधी संशोधन व विकासामध्ये आंतर-क्षेत्रीय सहयोगामधली तफावत, संभाव्यता ओळखून त्यासाठी संसाधनांच्या वाटपासंबंधी वैश्विक प्राधान्यकृत व्यवस्था आणि पुराव्यावर आधारित निर्णयाला हा आंतरराष्ट्रीय गट समर्थन देतो.
Share:

Sample Text


Copyright © MPSC PORTAL | Powered by Blogger Design by ronangelo | Blogger Theme by NewBloggerThemes.com